मैत्री...

     


     ऑगस्टचा पहिला रविवार आला की, सगळ्यांना 'फ्रेंडशिप डे' डोहाळे लागतात आणि अचानकच सगळ्यांना लांब- लांबचे सोम्या- गोम्या आठवतात . मग दिवसभर "Happy Friendship Day "च्या मॅसेजचा नुसता भडीमार होत असतो. मला देखील अनेक मॅसेज आले, पण मग विचार आला कि या दिवसाला इतके महत्त्व का? आणि याच दिवशी सगळयांना आपले मित्र आठवतात! हा झाला गंमतीचा भाग. पण हि एक पाश्चिमात्य संस्कृती जी आपल्याकडे आली ती कधी आली ? का आली ? असे अनेक प्रश्न तर आहेतच.

    इ.स १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरु झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम  दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र मैत्रिणी एकमेकांना Friendship Day च्या शुभेच्छा देतात, पुष्पगुच्छ, चॉकोलेट, रंगीत धागे बांधून हि मैत्री अशीच चिरंतन राहावी अशी सदिच्छा देतात. 

    Friendship Day च्या बाबतीत मला तशी फार ओढ किंवा त्याचं वेड तसं नाही. पण तो दिवस सगळीकडे साजरा केला जातो, म्हणून मला माझ्या बालपणापासून च्या सगळ्या मित्र- मैत्रिणीची आठवण मात्र नक्कीच येते. 

    पुण्याच्या सयाजीनाथ महाराज विद्यालयात मी दुसरीपर्यंत होते. माझ्या वर्गातील माझी आरती नावाची मैत्रीण. आता तर मला तीच फक्त नाव आठवतं आणि तो अंधुक-अंधुक डोळ्यासमोर येणारा चेहरा. मला तिच्याबद्दलची एकचं गोष्ट आठवते ती म्हणजे तिची विचित्र सवय ती अशी कि तिला अंगठा चोखायची वाईट सवय होती. आणि आम्ही दोघी एकमेकींचा हात पकडून खेळायचो, बस्स इतकचं !

    पुढे काही कारणास्तव मला ती शाळा सोडावी लागली व नि माझ्या मामाकडे राहायला आले. मामाकडे मी दुसरी ते सहावी पर्यंत शिकायला होते. तिथल्या शाळेतही माझी एक खास मैत्रीण झाली, तिचं नाव ईशा. आम्ही कधी एकमेकींच्या जिवलग झालो  ते काही कळलंच नाही. आमच्या आठवणी तर खूपच निराळ्या आहेत. आम्ही दोघी एकाच वर्गात, एकाच बाकावर बसायचो. मला लहानपणापासूनच लिखाण करायला फार आवडायचं. त्यामुळे वाचनापेक्षा माझं लिखाण वेळेआधीच पूर्ण असायचं. मग गृहपाठ द्यायच्या दिवशी तिचा बऱ्याचदा अपूर्ण असायचं आणि मग आम्ही दोघे एक व्यवसाय पुस्तिका , एक पान ती व बाजूचं पान मी अशा रीतीने पूर्ण करायचो आणि एकसारखं अक्षर काढून गृहपाठ पूर्ण करत असायचो. खेळत- उड्या मारत ती काही वर्षे कसे गेले कळलंच नाही. अजूनही ते दिवस आठवलं कि खूप छान वाटतं. पण पुन्हा काही कारणास्तव मला तीही शाळा सोडावी लागली व त्यानंतर सातवीला मी विरारला आले. व त्या शाळेत सुरवातीला माझं मन लागत नसे. कारण मी माझ्या ईशाला खूप मिस करायचे. हळूहळू दिवस जात होते. वर्गातल्या इतर मुलींशी गट्टी जमू लागली होती. हळूहळू तिथेही माझे अनेक मित्र- मैत्रिणी झाले. पण त्यात कुठेतरी मी माझ्या बालपणीच्या मैत्रिणींना शोधत होते. 

    पुढे शाळकरी आयुष्य संपवून मी कॉलेजच्या वाटेवर आले होते, आणि त्या वातावरणात स्वतःला कुठेतरी Adjust करायचं होत. या सगळ्यात ओळख झाली ती दोन माझ्या आयुष्यातील खास जागा घेणाऱ्या मैत्रिणींची त्या म्हणजे अंकिता आणि शीतल. त्यांनी माझ्या खूप वाईट वेळी / प्रसंगी माझी साथ दिली होती. 

    आपण असं बोलतो आणि ऐकले देखील असेल कि मित्र तोच जो आपल्या वाईट प्रसंगात आपल्या सोबत असतो. कारण सुखात आनंदासाठी तर सग्लेसिग असतात. पण एखादी परिस्थिती येते, तेव्हा खर तर माणसाची माणुसकी आणि मैत्रीतील मित्रता कळून येते असं मला वाटतं. आपण आपल्या आई-वडिलांपेक्षा आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवतो, त्यामुळे आपल्या अनेक गोष्टी, आपले सिक्रेक्टस त्यांना माहिती असतात. आणि हीच खरी गंमत असते आयुष्यतली जी प्रत्येकाने जपावी. मित्र हा आपल्या प्रत्येकालाच महत्वाचा असतो. मग त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल कि लगेच व्यक्त करावं. मनात आलं कि समोरच्याला बोलून टाकावा ज्यामुळे नातं अजून घट्ट आणि अतूट होते. त्यासाठी कोणत्याही ' Day' ची वाट बघू नये. पण हा 'मैत्रीचं' Celebration  हे नक्कीच झालं पाहिजे. यासाठी Friendship Day  आपण साजरा करत मैत्री जपणं जगूया! 

HAPPY FRIENDSHIP DAY... 



~ रामेश्वरी आहेर

Comments

  1. Khupach chan aathwani..
    Asech chan friends aaplyala milat jao.. hich god apeksha.🥰🥰💞👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर विचार... समर्पक मांडणी आणि विचारांची प्रगल्भता... प्रेरणादायी लेखन... मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.. डॉ अलका नाईक, मुंबई.

    ReplyDelete
  3. सुरेख मांडणी!!!

    ReplyDelete
  4. मैत्री विषयी खूप छान मार्मिक भाव सांगितले,लहानपण देगा देवा प्रमाणे बालपणीच्या गोष्टी मनात घर करून राहतात.निरागस मैत्री ती फकत बालपणीच असते.खूप छान विचार मांडले .खूप खूप अभिनंदन
    छाया गायकवाड (शिक्षिका) परभणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!