Posts

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

Image
- रामेश्वरी आहेर.   राजकारण आणि महिला हा विषय काही आपल्यासाठी नवीन नाही. कायमचं या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने याबाबत बोलावसं वाटतं आहे. फार पुर्वीपासुन महिला राजकारणात सक्रिय असण्याचे पुरावे आपल्याला इतिहासात आढळुन येतात. महिलांचा केवळ सहभाग नसुन त्यांची निर्णय प्रक्रिया, राजकीय व सामाजिक चेतना प्रफुल्लित करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे.  इसवी सन बाराव्या शतकानंतर राजकारभाराची सुत्रे महिलांच्या हाती गेल्याचे आपण पाहतो. अवघ्या तेराव्या वर्षी लढलेली रझिया, गोंडवाना संस्थानची महाराणी दुर्गावती, १६व्या शतकात चांदबिबी अशा अनेक महिलांची नावे इतिहासात कोरली गेली आहेत. त्यानंतर सतराव्या शतकात प्रत्यक्ष राज्यकारभार न करता राजकारणाला नवी दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊ. जिजाऊनंतर ठळकपणे दिसणारे नाव म्हणजे महाराणी ताराबाई. इसवी सन १७६६ ते १७९५ या काळात आपल्या कार्याने झळाळुव उठल्या त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर.  स्वांतत्रोत्तर काळात भारतीय राजकारणात स्त्रीयांचा मोठा सहभाग मिळाला आहे. ज्या समाजातील तळागाळातील स्त्रियांकरिता प्रेरणादायी ठरल्या....

'कलियुग' वेळीच सावध व्हा !

Image
     आपल्या भोवतालची सध्य परिस्थिती पाहता खरचं असे वाटु लागले आहे की, 'कलियुग'   यायला फार वेळ लागणार नाही. आपण पुर्वीच्या अनेक कथांमधुन हे ऐकलं, वाचलं असेल की, देवी देवतांनी अशी भविष्यवाणी करुन ठेवली आहे. या पृथ्वीतलावर जेव्हा पाप वाढेल, तेव्हा कलियुग आलेले असेल व पृथ्वीचा विनाष होण्यास वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल, मी हा संदर्भ इथे का देते ? खरं तर आपण सध्या ज्या वातावरणात जगत आहोत यापेक्षा वाईट अजुन काय होऊ शकतं? आपण सगळेच अनुभव घेत आहोत. गेल्या वर्षभरापासुन कोरोना विषाणु संसर्गाने संपुर्ण जगभरात थैमान घातले आहे. मृत्युचे तांडव हे चालुच आहे. हे सारं काही चालु असतानाचं आता देशभरात ऑक्सिजन तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणांहुन मदत मागवली जात आहे. ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  आपण सोशल मिडियावर वायरल झालेली एक पोस्ट पाहिली असेलंच की, "जेव्हा काही वर्षांपुर्वी पाण्याची विक्री चालु झाली. तेव्हा याबाबत मस्करी केली गेली, थट्टा उडवली आणि आज प्राणवायुसाठी पैसा द्यावा लागतो."  आपण आजपर्यंत कितीतरी पैसा पाण्याकरिता पाण्यासार...

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

Image
भारत कृषिप्रधान देश असला, तरीही आपले प्रशासन आणि सरकारचे निर्णय मात्र, कृषिपूरक नाहीत; हे गेल्या अनेक आठवड्यापासून होत असणाऱ्या आंदोलनातून सिध्द झाले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ञांचे मत आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या घटनेने अनेक संसार रस्त्यावर आले, अनेक कुटुंब अनाथ झाले, ज्या घटनेचा आकडा वर्षानुवर्षे वाढत आहे, शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे,अशी घटना म्हणजे शेतकरी आत्महत्या! राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेची नोंद होऊन 35 वर्ष पूर्ण झाली असली, तरी विकसनशील देशात अशी घटना घडू नये म्हणून अद्याप उपाययोजना नाही ही शरमेची बाब आहे. आत्महत्या करून देखील पुराव्याअभावी आत्महत्या शेतकरी आत्महत्या नाही असा शेरा मिळतो, असे अनेक प्रकरण सरकार दरबारी अपात्र ठरवलेली आहेत. एक लाखाची तुटपुंजी मदत बोटावर मोजण्याइतकीच कुटुंबाला मिळते. शेतकरी आत्महत्यमध्ये माणूस कायमचा गेला यावर ठरत नाही, तर तो शासकीय अटी, कागदी पुरावे याव...

"ती"ला कमी लेखू नका.."

Image
         या विषयावर यापूर्वी कधी भाष्य केलं गेलं नाही, अशातला भाग नाही... मात्र तरीदेखील पुन्हा - पुन्हा का या विषयांवर बोललं जातं, लिहिलं जातं, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आपण सर्वजण घरीच आहोत आणि आपल्यातील अनेकांना हे जाणवले की आपण रोज काम करत असतो, आपल्याला आठवड्यात काही सुट्ट्या तरी मिळतात, मात्र आपल्या घरातील स्त्रियांना कधीच सुट्टी मिळत नाही. वर्षाचे बारा महिने रात्रंदिवस ती निस्वार्थपणे कोणताही मोबदला न घेता काबाडकष्ट करत असते. सोशिकपणा तिच्या ठायी ठायी भरलेला असतो, तरीही आपण तिची योग्य ती दखल घेत नसतो. उलट ती आपल्या लेखी दुय्यम असते व आपण तिची सतत उपेक्षाच करतो आणि हे अनादीकालापासून चालू आहे. शिक्षण घेणेअसो किंवा मग नोकरी, व्यवसाय करणे असो. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त "चूल आणि मूल" सांभाळायचे,असा अलिखित नियमच होता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच स्थिती होती. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेऊ दिलं जात नसे. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटली, तमाम स्त्रीयांच्या जीवनात उष:काल झाला. सावि...

कोरोनाने मानवाच्या मर्यादा स्पष्ट...

Image
     लॉकडाऊनच्या काळात माणसाचं काळीज पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग मानवावर आले.मुंबईत आता रोजगार नाही,आपल्या कुटुंबाच्या जेवणाचे काय ? आणि मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर,अशा परिस्थितीत भयभीत झालेले प्ररप्रांतिय कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मिळेल ते वाहन पकडून गावी निघाले होते.वाहनात गुरढोरांसारखी कोंबलेली माणसे,लहान मुलांना वाहनात चढवताना,आणि मैलो न मैल पायी चालत निघालेले,अशी अनेक हृदयद्रावक दृष्ये,आपण पाहिली.एका छायाचित्राने तर आपण सारे सुन्न झालो.त्या बाळाची  काय चूक आहे ? असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात नक्कीच उभा राहिला असेल. एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.त्याच्या वडिलांनी वाहनात शिरताना त्याला ज्या पद्धतीने वाहनात चढवले,तो प्रकार अमानुष असाच होता.पण बाप तरी काय करणार हो,तो ही असहाय्य होता.कारण त्याला कुटुंबातील प्रत्येकाचा जीव वाचवायचा होता. वास्तविक सरकार,त्याकाळी फारसे संवेदनशील नव्हते,त्यामुळे परप्रांतीयांचे अतोनात हाल झाले.अनेकांचे जीव गेले,तर लहान मुलांनाही अतोनात त्रास सहन करावा लागला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्य...

मैत्री...

Image
           ऑगस्टचा पहिला रविवार आला की, सगळ्यांना 'फ्रेंडशिप डे' डोहाळे लागतात आणि अचानकच सगळ्यांना लांब- लांबचे सोम्या- गोम्या आठवतात . मग दिवसभर "Happy Friendship Day "च्या मॅसेजचा नुसता भडीमार होत असतो. मला देखील अनेक मॅसेज आले, पण मग विचार आला कि या दिवसाला इतके महत्त्व का? आणि याच दिवशी सगळयांना आपले मित्र आठवतात! हा झाला गंमतीचा भाग. पण हि एक पाश्चिमात्य संस्कृती जी आपल्याकडे आली ती कधी आली ? का आली ? असे अनेक प्रश्न तर आहेतच.     इ.स १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरु झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम  दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र मैत्रिणी एकमेकांना Friendship Day च्या शुभेच्छा देतात, पुष्पगुच्छ, चॉकोलेट, रंगीत धागे बांधून हि मैत्री अशीच चिरंतन राहावी अशी सदिच्छा देतात.      Friendship Day च्या बाबतीत मला तशी फार ओढ किंवा त्याचं वेड तसं नाही. पण तो दिवस सगळीकडे साजरा केला जातो, म्हणून मला माझ्या बालपणापासून च्या सगळ्या मित्र- मैत्रिणीची आठवण मात्र नक्कीच येते.  ...

वास्तव...

Image
      हा फोटो मन अगदी पिळवटून टाकणार आहे. काय चूक आहे त्या लहान बाळाची? एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.पण आपण मात्र बघतो तितकंच आणि एकतो तेवढंच खर  मानतो.पण वास्तव?  वास्तव काही वेगळचं आणि महाभयंकर आहे. अशा वेळी का मनात प्रश्न उभा राहणार नाही की सरकार काय करतंय? आणि असे अनेक प्रश्न येतात देखील.      लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अनेक मदतीचे हात पुढे आले. दिग्गज मंडळी, अनेक संस्था, सामान्य जनतेकडून देखील आपल्या परीने मदतीचे हात आले. पण त्या रक्कमेच पुढे काय झालं?       कोरोणा विषाणू संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले आणि लाखो कोरोनाग्रस्थ देखील आहेत.      आपण हे नेहमीचं ऐकल असेल आणि खूप वेळा डायलॉग म्हणून मारला देखील असेलच ना की "Nothing Is Impossible" त्यानुसार आपण एक दिवस या सगळ्या परिस्थितीतून बाहेर तर नक्कीच पडू. पण या लॉकडाऊन मध्ये कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. वृध्द माणसे, लहान बालके, गर्भवती महिला....