पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...
भारत कृषिप्रधान देश असला, तरीही आपले प्रशासन आणि सरकारचे निर्णय मात्र, कृषिपूरक नाहीत; हे गेल्या अनेक आठवड्यापासून होत असणाऱ्या आंदोलनातून सिध्द झाले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ञांचे मत आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्या घटनेने अनेक संसार रस्त्यावर आले, अनेक कुटुंब अनाथ झाले, ज्या घटनेचा आकडा वर्षानुवर्षे वाढत आहे, शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे,अशी घटना म्हणजे शेतकरी आत्महत्या! राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेची नोंद होऊन 35 वर्ष पूर्ण झाली असली, तरी विकसनशील देशात अशी घटना घडू नये म्हणून अद्याप उपाययोजना नाही ही शरमेची बाब आहे. आत्महत्या करून देखील पुराव्याअभावी आत्महत्या शेतकरी आत्महत्या नाही असा शेरा मिळतो, असे अनेक प्रकरण सरकार दरबारी अपात्र ठरवलेली आहेत. एक लाखाची तुटपुंजी मदत बोटावर मोजण्याइतकीच कुटुंबाला मिळते. शेतकरी आत्महत्यमध्ये माणूस कायमचा गेला यावर ठरत नाही, तर तो शासकीय अटी, कागदी पुरावे याव...