Posts

Showing posts from March, 2019

" बाप रे बाप"....

Image
       अगदी शाळेपासूनच... म्हणजे निबंध लिहून आणा असे आपल्याला सांगितले की योगायोगाने का होईना सगळ्यांचा आवडत ऋतु एकच असायचा तो म्हणजे 'पावसाळा'...पण त्यावेळी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी आणि घरी राहून धम्माल करायची बसं एवढंच.. पण आता ?  खरं तर पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, तसाच तो मलाही खुप आवडतो.पण यावेळी पावसाने  मात्र कमालच म्हणजे अगदी 'आली लहर केला कहर' याचप्रमाणे...उन्हाळ्यात पावसाची वाट बघून बघून पावसाला शिव्या दिल्या की,'पड ना आता पड.. आता का नाही पडत'..वगैरे सगळं आणि त्यानुसार पावसाने ऐकलं आणि सुरुवात झाली ती एवढी की बाप रे! अगदी सलग तीन-चार दिवस तो काही आता जायचं नावच घेत नव्हता, आणि मलाही खुप कंटाळा आला. कारण चार दिवसांपासून सगळीकडे घडणाऱ्या वाईट घटना, पाणी साठलेले, कॉलेज बंद, त्यामुळे कुठे जाण्याची सोय नाही. त्यात मी राहते पालघर ला ..मित्रांच्या म्हणण्यानुसार गावालाच,इथून आधीच ट्रेन कमी, त्यात पावसाने अस थैमान घातले की त्यामुळे आहे नाही त्या पण ट्रेन बंद झाल्या आणि चक्क सलग चार दिवस मी घरीच..      त्यात मी एक गंमत के...

आजची स्त्री....

Image
     ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयाॅर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला, तरी  १९१० च्या आंतरराष्र्टीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार ८ मार्च हा महिला दिन म्हणून जाहीर झाला.      पिढ्यान पिढ्या चालत आलेले चूल  व मूल या संकल्पनेतुन बाहेर येत महिलांनी ४ दशकांपूर्वी घराचा उंबरठा ओलांडला, ते स्वत:ला सिध्द करण्यासाठीच. तिच्या डोक्यावर संसाराची  घागर असते ....प्रत्येकीच्या घागरीत सुख-दुःख,काबाडकष्ट,ओढाताण  ओतप्रोतअसते, त्याचा तोल सांभाळतच तिला आयुष्याची वाटचाल करायची असते. विचारांची,जाणीवांची, जबाबदारीची संवेदना आणि सासर-माहेरचा समतोल ठेवूनच तिला आपली वाटचाल करायची असते. ते ही  ताठ मानेने व चेहर्‍यावर  खरं किंवा उसनं हसू ठेवतंच. पायी काटे, डोईवर रणरणतं उन... तरीही ती राबतच आहे. युगानूयुगे..... तन मन थकले तरी ... कर्तव्य तीचे चालूच आहे.... तरीही .... पाणी आणि घागरीचा तोल ती यशस्वीपणे सांभाळत आली आहे....      एकोणीसा...