'कलियुग' वेळीच सावध व्हा !
आपल्या भोवतालची सध्य परिस्थिती पाहता खरचं असे वाटु लागले आहे की, 'कलियुग' यायला फार वेळ लागणार नाही. आपण पुर्वीच्या अनेक कथांमधुन हे ऐकलं, वाचलं असेल की, देवी देवतांनी अशी भविष्यवाणी करुन ठेवली आहे. या पृथ्वीतलावर जेव्हा पाप वाढेल, तेव्हा कलियुग आलेले असेल व पृथ्वीचा विनाष होण्यास वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल, मी हा संदर्भ इथे का देते ? खरं तर आपण सध्या ज्या वातावरणात जगत आहोत यापेक्षा वाईट अजुन काय होऊ शकतं? आपण सगळेच अनुभव घेत आहोत. गेल्या वर्षभरापासुन कोरोना विषाणु संसर्गाने संपुर्ण जगभरात थैमान घातले आहे. मृत्युचे तांडव हे चालुच आहे. हे सारं काही चालु असतानाचं आता देशभरात ऑक्सिजन तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणांहुन मदत मागवली जात आहे. ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपण सोशल मिडियावर वायरल झालेली एक पोस्ट पाहिली असेलंच की, "जेव्हा काही वर्षांपुर्वी पाण्याची विक्री चालु झाली. तेव्हा याबाबत मस्करी केली गेली, थट्टा उडवली आणि आज प्राणवायुसाठी पैसा द्यावा लागतो." आपण आजपर्यंत कितीतरी पैसा पाण्याकरिता पाण्यासार...