सोशल मीडियाचा परिणाम...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासातील संपर्क क्रांति घडवून आणणाऱ्या सोशल मीडियाने आज जगभरातील बहुतांश लोकांचे जीवन व्यापून टाकले आहे. या सगळ्या नवनवीन समाज माध्यमांचा वापर आणि पगडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . पण याचा फायदा किती? नुकसान किती? हे आपल्याला वारंवार अनेक घटना प्रसंगातून दिसून येते. सोशल मीडिया म्हणजे नवसमाज माध्यमे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालली आहे, व बनली आहे असा आपण म्हणू शकतो. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे किंवा नियमित वापरामुळे चिंता एकटेपणा आणि आत्मविश्वास कमतरता जाणवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचबरोबर शारीरिक आणि मानसिक समस्या वाढताना दिसत आहेत. या समस्या फक्त तरुणांमध्ये नाही, तर लहान मुलांमध्ये देखील दिसून येत आहेत. या संबंधित अनेक बातम्या आपण टीव्ही वरती पाहिलेल्या आणि वर्तमानपत्रात वाचलेल्या आहेत. सोशल मीडियाचा वापर करून आपण ऑनलाईनच्या जगात आपल्या आयुष्याचं वेगळे चित्र तयार करत असतो. व स्वतः विषयीच्या अपेक्षा वाढवत असतो, म्हणजेच आपल्या फोटो किंवा कोणत्याही प...