भाई...एक पर्वणी!
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल. देशपांडे ऊर्फ “भाई”. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे विस्तीर्ण ज्ञान, अनुभव जीवनाबद्दल आस्था, आत्मीयता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणूनच पु. लं यांच्या साहित्यातील वाचकाचा प्रवास सुध्दा सुखकर व अल्लाहदायक आहे. शाळेत तसेच भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणे सेवादलाच्या पथकांसाठी कार्यक्रम लिहून देणे येथूनच त्यांच्या लेखणीला खरी सुरुवात झाली. १९३७ पासून छोट्या-मोठ्या नाटकात भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. त्याच वर्षी त्यांनी अनंत काणेटकरांच्या पैजार या श्रुतिकेत काम केले. यानंतर हळूहळू आपल्या लिखाणातून, हजरजबाबीपणा यातून लोकांचे मन जिंकले. १९४४ साली पु.लं यांचे व्यक्तिचित्रण (नागपूरकर) अभिरूची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. १९४७ ते १९५६ हा त्यांच्या चित्रपटात पदार्पणाचा काळ होता. 'वंदे मातरम', 'दूध-भात', 'गुळाचा गणपती' या चि...