Posts

Showing posts from May, 2020

वास्तव...

Image
      हा फोटो मन अगदी पिळवटून टाकणार आहे. काय चूक आहे त्या लहान बाळाची? एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.पण आपण मात्र बघतो तितकंच आणि एकतो तेवढंच खर  मानतो.पण वास्तव?  वास्तव काही वेगळचं आणि महाभयंकर आहे. अशा वेळी का मनात प्रश्न उभा राहणार नाही की सरकार काय करतंय? आणि असे अनेक प्रश्न येतात देखील.      लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अनेक मदतीचे हात पुढे आले. दिग्गज मंडळी, अनेक संस्था, सामान्य जनतेकडून देखील आपल्या परीने मदतीचे हात आले. पण त्या रक्कमेच पुढे काय झालं?       कोरोणा विषाणू संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले आणि लाखो कोरोनाग्रस्थ देखील आहेत.      आपण हे नेहमीचं ऐकल असेल आणि खूप वेळा डायलॉग म्हणून मारला देखील असेलच ना की "Nothing Is Impossible" त्यानुसार आपण एक दिवस या सगळ्या परिस्थितीतून बाहेर तर नक्कीच पडू. पण या लॉकडाऊन मध्ये कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. वृध्द माणसे, लहान बालके, गर्भवती महिला....