Posts

Showing posts from August, 2020

मैत्री...

Image
           ऑगस्टचा पहिला रविवार आला की, सगळ्यांना 'फ्रेंडशिप डे' डोहाळे लागतात आणि अचानकच सगळ्यांना लांब- लांबचे सोम्या- गोम्या आठवतात . मग दिवसभर "Happy Friendship Day "च्या मॅसेजचा नुसता भडीमार होत असतो. मला देखील अनेक मॅसेज आले, पण मग विचार आला कि या दिवसाला इतके महत्त्व का? आणि याच दिवशी सगळयांना आपले मित्र आठवतात! हा झाला गंमतीचा भाग. पण हि एक पाश्चिमात्य संस्कृती जी आपल्याकडे आली ती कधी आली ? का आली ? असे अनेक प्रश्न तर आहेतच.     इ.स १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरु झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम  दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र मैत्रिणी एकमेकांना Friendship Day च्या शुभेच्छा देतात, पुष्पगुच्छ, चॉकोलेट, रंगीत धागे बांधून हि मैत्री अशीच चिरंतन राहावी अशी सदिच्छा देतात.      Friendship Day च्या बाबतीत मला तशी फार ओढ किंवा त्याचं वेड तसं नाही. पण तो दिवस सगळीकडे साजरा केला जातो, म्हणून मला माझ्या बालपणापासून च्या सगळ्या मित्र- मैत्रिणीची आठवण मात्र नक्कीच येते.  ...