Posts

Showing posts from September, 2020

"ती"ला कमी लेखू नका.."

Image
         या विषयावर यापूर्वी कधी भाष्य केलं गेलं नाही, अशातला भाग नाही... मात्र तरीदेखील पुन्हा - पुन्हा का या विषयांवर बोललं जातं, लिहिलं जातं, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आपण सर्वजण घरीच आहोत आणि आपल्यातील अनेकांना हे जाणवले की आपण रोज काम करत असतो, आपल्याला आठवड्यात काही सुट्ट्या तरी मिळतात, मात्र आपल्या घरातील स्त्रियांना कधीच सुट्टी मिळत नाही. वर्षाचे बारा महिने रात्रंदिवस ती निस्वार्थपणे कोणताही मोबदला न घेता काबाडकष्ट करत असते. सोशिकपणा तिच्या ठायी ठायी भरलेला असतो, तरीही आपण तिची योग्य ती दखल घेत नसतो. उलट ती आपल्या लेखी दुय्यम असते व आपण तिची सतत उपेक्षाच करतो आणि हे अनादीकालापासून चालू आहे. शिक्षण घेणेअसो किंवा मग नोकरी, व्यवसाय करणे असो. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त "चूल आणि मूल" सांभाळायचे,असा अलिखित नियमच होता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच स्थिती होती. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेऊ दिलं जात नसे. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटली, तमाम स्त्रीयांच्या जीवनात उष:काल झाला. सावि...

कोरोनाने मानवाच्या मर्यादा स्पष्ट...

Image
     लॉकडाऊनच्या काळात माणसाचं काळीज पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग मानवावर आले.मुंबईत आता रोजगार नाही,आपल्या कुटुंबाच्या जेवणाचे काय ? आणि मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर,अशा परिस्थितीत भयभीत झालेले प्ररप्रांतिय कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मिळेल ते वाहन पकडून गावी निघाले होते.वाहनात गुरढोरांसारखी कोंबलेली माणसे,लहान मुलांना वाहनात चढवताना,आणि मैलो न मैल पायी चालत निघालेले,अशी अनेक हृदयद्रावक दृष्ये,आपण पाहिली.एका छायाचित्राने तर आपण सारे सुन्न झालो.त्या बाळाची  काय चूक आहे ? असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात नक्कीच उभा राहिला असेल. एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.त्याच्या वडिलांनी वाहनात शिरताना त्याला ज्या पद्धतीने वाहनात चढवले,तो प्रकार अमानुष असाच होता.पण बाप तरी काय करणार हो,तो ही असहाय्य होता.कारण त्याला कुटुंबातील प्रत्येकाचा जीव वाचवायचा होता. वास्तविक सरकार,त्याकाळी फारसे संवेदनशील नव्हते,त्यामुळे परप्रांतीयांचे अतोनात हाल झाले.अनेकांचे जीव गेले,तर लहान मुलांनाही अतोनात त्रास सहन करावा लागला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्य...