वास्तव...



      हा फोटो मन अगदी पिळवटून टाकणार आहे. काय चूक आहे त्या लहान बाळाची? एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.पण आपण मात्र बघतो तितकंच आणि एकतो तेवढंच खर  मानतो.पण वास्तव?  वास्तव काही वेगळचं आणि महाभयंकर आहे. अशा वेळी का मनात प्रश्न उभा राहणार नाही की सरकार काय करतंय? आणि असे अनेक प्रश्न येतात देखील.

     लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अनेक मदतीचे हात पुढे आले. दिग्गज मंडळी, अनेक संस्था, सामान्य जनतेकडून देखील आपल्या परीने मदतीचे हात आले. पण त्या रक्कमेच पुढे काय झालं? 

     कोरोणा विषाणू संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले आणि लाखो कोरोनाग्रस्थ देखील आहेत.

     आपण हे नेहमीचं ऐकल असेल आणि खूप वेळा डायलॉग म्हणून मारला देखील असेलच ना की "Nothing Is Impossible" त्यानुसार आपण एक दिवस या सगळ्या परिस्थितीतून बाहेर तर नक्कीच पडू. पण या लॉकडाऊन मध्ये कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. वृध्द माणसे, लहान बालके, गर्भवती महिला. 

     खरं तर कोणी कधीच विचार केला नसेल की,आपणही एका पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आपल्याच घरात आपण अडकून पडून राहू. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. प्रत्येकजण कधी एकदाचं लॉकडाऊन संपेल आणि आपण आपापल्या घरी परतू याच चिंतेत आहे.

     शासनामार्फत तसेच अनेक संस्थांमार्फत त्याचबरोबर ज्याला शक्य होईल तो प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचिण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
पण कुठेतरी काहीतरी चुकतंय नक्की, सगळीकडे अन्न व आवश्यक सुविधा पोहचत नाहीत.अशा वेळी या गरजू लोकांना कोरोना पुढे आपलं कुटुंब भुकेने मरू नये हेच वाटतं आणि म्हणूनच त्यांना समोर ना कायदा दिसत व ना कोरोना!


-रामेश्वरी आहेर

Comments

  1. ब्लॉग वाचून शब्द माझे स्तब्ध झाले,
    याचा शेवट कसा होईल ? या प्रश्नाचे उत्तर आजच्या घडीला कोणाकडेही नाही..

    ReplyDelete
  2. खुपच वास्तव चिञ, पण याला जबाबदार कोण चिन कि आपली बेशिस्त जनता उत्तर शोधायला हव.निरमानकरता कि व्हायरसला पोचवणारा.... just think..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!