सोशल मीडियाचा परिणाम...

       


आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासातील संपर्क क्रांति घडवून आणणाऱ्या सोशल मीडियाने आज जगभरातील बहुतांश लोकांचे जीवन व्यापून टाकले आहे. या सगळ्या नवनवीन समाज माध्यमांचा वापर आणि पगडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . पण याचा फायदा किती? नुकसान किती? हे आपल्याला वारंवार अनेक घटना प्रसंगातून दिसून येते. सोशल मीडिया म्हणजे नवसमाज माध्यमे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालली आहे, व बनली आहे असा आपण म्हणू शकतो. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे किंवा नियमित वापरामुळे चिंता एकटेपणा आणि आत्मविश्वास कमतरता जाणवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचबरोबर शारीरिक आणि मानसिक समस्या वाढताना दिसत आहेत. या समस्या फक्त तरुणांमध्ये नाही, तर लहान मुलांमध्ये देखील दिसून येत आहेत. या संबंधित अनेक बातम्या आपण टीव्ही वरती पाहिलेल्या आणि वर्तमानपत्रात वाचलेल्या आहेत.

        सोशल मीडियाचा वापर करून आपण ऑनलाईनच्या जगात आपल्या आयुष्याचं वेगळे चित्र तयार करत असतो. व स्वतः विषयीच्या अपेक्षा वाढवत असतो, म्हणजेच आपल्या फोटो किंवा कोणत्याही पोस्टला कमी लाईक किंवा कमी कमेंट मिळाल्या तर आपल्याला काहीतरी कमतरता जाणवते, काहीतरी राहिल्यासारखे वाटत राहते व याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपल्या मनावर होत असतो. समाज माध्यमातून आपण प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक अनुभवांना आपल्या आयुष्याला अनोळखी व्यक्ती समोर खुलेपणाने मांडतो. त्यानुसार आपले व्हाट्सअप स्टेटस, इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर पडत असतात आणि त्यावर येणारे रिप्लाय कुठेतरी सहानुभूती मिळवणे अशी अपेक्षा आपोआपच मनात तयार होते. या सगळ्या गोष्टी आपल्या हातून होत असतात. यामुळे समाजातच नैराश्य वाढत चालले आहे,  द्वेषभावना वाढत चालली आहे.

 
          आपण सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलो होत की आपल्याला फक्त सोशल मीडिया इतकच जग व त्यापलीकडे असणारे आपण पाहूच शकत नाही. कारण सोशल मीडियाचा वापर करताना आपण आपल्या विचारांशी साधर्म्य असलेल्या बातम्या, वैचारिक लिखाण किंवा मनोरंजनासाठी काही व्हिडिओ हेच आपण सोशल मीडियात शोधत राहतो. यामुळे मात्र सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना आपले आचारविचार संकुचित मानसिकतेचे होत चालले आहेत. आपण आपले प्रत्येक काम या तंत्रज्ञानाचा वापर करून करत असतो, विकासाच्या दिशेने आपण पावलं टाकतो असे आपण बोलतो पण याचा नक्की आपल्याला फायदा होतो का? हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही. अनेक अभ्यासक सोशल मिडियामुळे व्यक्ती संकुचित विचारांच्या मानसिकतेच्या बनत चालले आहेत का याचा अभ्यास करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सुख-सुविधा वाढल्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आलो आहोत परंतु एकमेकांतील संवाद संपर्क जिव्हाळा कमी झाला आहे. फेसबूक ट्विटर व्हाट्सअप आणि वेगवेगळ्या मीडियावरील ॲपच्या जाळ्यात अडकून मृगजळामागे धावण्याच्या स्पर्धेत आपण सतत असतो, या जाळ्यात न अडकता योग्य वापर आपणच आपल्या परीने केला पाहिजे. आपला आत्मविश्वास कोणत्याही गोष्टीमुळे कमी होणार नाही यादृष्टीने या गोष्टीकडे बघावे. विकसित होणारे तंत्रज्ञान मानवासाठी हानिकारक न होता फायदेशीर कशाप्रकारे करून घेता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी होणे महत्त्वाचे आहे.


- रामेश्वरी आहेर

Comments

  1. खरच हे 1 आजचे समाजातील वास्तव सत्य आहे
    एवढेच नाही तर मी देखील हे अनुभवले आहे आणि म्हणूनच हा लेख प्रत्येकाने वाचावा,आणि 1 विचार करावा आधुनिकतेचा प्रभाव हा सकारात्मक असावा त्यातुन माणुसकी ,आपुलकी वाढत जाणारी असावी, या तुनच खरा समाज सुधरेल़

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!